पुसद : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात अवकाळी पावसाने मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात अवकाळी पावसासह वीज कोसळयाची घटना घडली आहे. तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या समाधी स्थळावरील गुंबडवर अचानक वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून बांधकाच्या अनेक भागाला तडे गेले आहे.
हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्हयात विजेसह अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने लावलेला तो अंदाज पुसद तालुक्यात बरोबर लागला आहे. तालुक्यात दि. १८ मार्च रोजी दिवसभर उन्हाचे चटके लागत होते. मात्र, रात्र होता होता थंडी पडण्यास सुरूवात झाली. त्यानंतर रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. तालुक्यात जोरदार पावसासह वीज कोसळल्याची घटना घडली आहे. तालुक्यात अचानक पडलेल्या पावसामुळे अंब्याच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर तालुक्यातील गहुली गावात रात्री पावसासह विजेचा कडकडाट ग्रामस्थांनी अनुभवला आहे. गहुली येथील कै. वसंतराव नाईक यांची समाधी असून अचानक पावसासह समाधी स्थळाच्या गुंबडवर रात्री १२:३0 वाजताच्यादरम्यान वीज कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. विजेमुळे समाधी स्थळाचे मोठे नुकसान झल्याचे सर्वात पहिले सकाळी गावात राहणारे नाईक यांच्या शेतात काम करणारे त्यांचे कामगार विनोद ढगे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गावातील पंचायत समिती सदस्यांचे पती रूपेश जाधव यांना ओंकार राठोड यांनी फोन करून माहिती दिली. समाधी स्थळावर पडलेल्या विजेमुळे मोठे नुकसान झाले असुन लोकप्रतिनिधींनी समाधी स्थळाची पाहणी करून समाधी स्थळ पूर्वी सारखेच करण्याची मागणी त्यांच्या चाहत्यांकडुन होत आहे. तर पुसदचे तहसीलदार अशोक गीते यांनी समाधी स्थाळाला भेट दिली असुून शासनाकइन आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यावेळी दिली आहे.
महानायक वसंतराव नाईक यांच्या समाधीवर कोसळली वीज
Contents hide