वर्धा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम २0२0-२१ अंतर्गत प्रसिद्धीसाठी बातमीदार, माध्यम प्रतिनिधींना जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी प्रवेशिका दिनांक १५ जून पयर्ंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. लहानसहान कारणांवरून निर्माण होणारे तंटे सामोपचाराने सुटावेत, गावागावात शांतता नांदावी, याकरिता माध्यमे अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रसिद्धी देणार्या पत्रकारांना पारितोषिक जाहीर केलेले आहे.
जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार २५ हजार, द्वितीय १५ हजार आणि तृतीय १0 हजार रुपए आहे. विभागीय स्तरावर प्रथम १ लक्ष रुपए तर राज्यस्तरावर २ लक्ष ५0 हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार आहे. जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्काराची प्रवेशिका विभागस्तरावर पात्र ठरेल. मोहिमेंतर्गत दिनांक २ मे २0२0 ते १ मे २0२१ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख, यशकथा अथवा या मोहिमेत सहभागाबद्दल पुरावे छायाचित्रांसह संपूर्ण कात्रणांची फाईल प्रवेशिकेसह जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालयात सोमवार, दिनांक १५ जून २0२१ पयर्ंत पाठवावयाची आहे. पुरस्काराच्या पात्रतेसाठी वृत्तपत्रे, नियतकालिके यातून प्रसिद्ध मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्याचा विचार करण्यात येईल.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुरस्कार प्रवेशिका आमंत्रित
Contents hide