अमरावती : स्थानिक बॅक आॅफ महाराष्ट्र यशोदा नगर शाखेत सामान्य ग्राहकांनी जनधन खाते काढून आपले व्यवहार करणे सुरू केले सामान्य माणूस आपले उदरनिर्वाह करून दोन पैशाची बचत करतो व आपल्या बचत खात्यात पैसै जमा करतो झिरो बजट खात्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नसताना मात्र या शाखेतून मिनीमम बॅलेंसच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस लावून सर्हास ग्राहकाच्या खात्यातून पैसे कापल्या जात आहे, बॅकेच्या या अजब कारभारास कंटाळून सामान्य ग्राहक आपले बचत खातॆ बंद करण्याच्या मार्गावर आहेत.! शाखा व्यवस्थापकाच्या ही बाब लक्षात आणून देवूनही ग्राहकाकडे लक्ष दिल्या जात नाही. पासबुक प्रिंटींग करणारा शिपाई आपल्याच तोर्यात ग्राहकांना दमदाटी करतो व ग्राहकास तुमचेकडून जे होईल करा, तक्रार करा माझे काही होणार नाही अशा अविर्भावात वागतो याचा महिला ग्राहक व सामान्य खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकार्यांनी मुजोर हेकेखोर शिपाई याची उचलबांगडी करून सामान्य ग्राहकांना न्याय देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.