• Fri. Jun 9th, 2023

बसमधली काॅलेजची पोरं पोरी …

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021
    पोरींना जागा मिळावी म्हणून बॅग
    घाईने खिडकीत टाकतात
    वृद्ध वयस्कर माणसंही गर्दीतून
    वाट काढत बसमध्ये शिरतात
    बसायला जागा मिळेल म्हणून
    सगळीकडेच नजर फिरवतात
    पण बसमध्ये येण्याआधीच सर्वञ
    बॅग रूमाल त्यांना दिसतात
    काही बिचारे थकल्यामुळे त्या
    बॅगजवळच जाऊन बसतात
    आजोबा माझी बॅग पोरींनी
    म्हणताच निमुटपणे उभी राहतात
    हितगूज करत बसलेल्या दोघांकडे
    ते मोठ्या आशेने ते पाहतात
    कसलाच फरक पडत नसतो त्यांना
    आपल्याच विश्वात मस्तपणे रमतात
    ज्यांना दिसतात आजोबा त्यांच्यात
    आपले ते पोरं माञ जागा देतात
    संस्कार चांगुलपणा पाहून पोरांचा
    तेव्हा ते मायेने हात फिरवतात
    अन् संस्कार विसरलेले पोरं पोरी
    हाय बाय करून खाली उतरतात
    थोडा विचार करा पोरा पोरींनो
    तुम्हीही कोणाचे नातवंड असतात

    कवी-अजय बनसोडे ,

    मु.दापेगाव ता औसा जि लातूर
    8408042349

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *