• Sun. May 28th, 2023

बनावट प्रमाणपत्र देणा-या टोळीपासून सावध राहा‘सीएस’चे दिव्यांग बांधवांना आवाहन

ByGaurav Prakashan

Mar 23, 2021

अमरावती: दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.
चार दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत तिवसा पोलीस ठाण्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील सही व शिक्केही बनावट होते. त्यामुळे अशी टोळी जिल्ह्यात सक्रिय असून, दिव्यांग बांधवांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.
अडचण आली तर संपर्क साधा
दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राविषयी काहीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कक्ष क्रमांक 29 येथील सामाजिक सेवा विभागात संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

(Image Credit : Sakal)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *