मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखला एका कार्यक्रमात प्रीती झिंटाला मिठी मारणे महागात पडले. रितेश प्रीतीला मिठी मारतो, तिच्या हाताचा किस घेतो, हे सर्व करताना त्याची बायको अर्थातच अभिनेत्री जेनेलिया देशमुख शेजारी उभी असते. आपल्या बायकोसमोर दुसर्या अभिनेत्रीसोबत असा व्यवहार करणे, म्हणजे धाडसचं म्हणावे लागेल. हा व्हिडिओ व्हायरल झालाय. रितेशच्या या वागणुकीनंतर जेनेलियाने खुन्नस मनात ठेवून काय केलंय पाहा.
रितेश, प्रीती झिंटा आणि जेनेलियाचा सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख प्रीती झिंटासोबत हसत-हसत तिच्या हाताला किस करताना दिसून येतोय. यावेळी त्यांच्या शेजारी उभी असलेली जेनेलिया सर्वकाही निमूटपणे पाहत असते. कुठली बायको आपल्या नवर्याला हे सर्व करताना पाहील. खरंतरं, यावेळी जेनेलियाचा चेहर्यावरचा रंग बदललेला दिसत आहे. तिला आपला राग अनावर होताना दिसत आहे. पण, आपल्या रागाला ती हसून नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय.
या जुना व्हिडिओ असला तरी आता जेनेलियाने हा कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे. तिने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दोन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करण्यात आले असून एका व्हिडिओत सोहळ्यात प्रीती झिंटा रितेश देशमुखला भेटते. तर दुसर्या व्हिडिओत रितेशचे प्रीती झिंटासोबतचे वागणे पाहून तिला राग येतो.
रागाच्या भरात जेनेलिया रितेशला पंच मारताना दिसत आहे. रितेश देशमुख जेनेलियाचा मार खाताना दिसत आहे. रितेश तिच्यासमोर हात जोडतो. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला रामलखन चित्रपटातील तेरा नाम लिया तुझे याद किया हे गाणंदेखील सुरू असल्याचं दिसत आहे. शेवटी जेनेलियाने प्रीती झिंटाला क्यूट असं म्हटलं असून ट्विटर व्हिडिओमध्ये प्रीतीला टॅग केलं आहे.
प्रीती झिंटाला मिठी मारणे रितेशला पडले महागात..!
Contents hide