अमरावती : प्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याता प्रा. अरूण बा. बुंदेले यांची अमरावती येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी दि.10 व 11 मार्च, 2021 ला ऑनलाईन संपन्न होत असलेल्या बाराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड संमेलनाचे आयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, जनसंपर्क अधिकारी श्री. प्रभाकर वानखडे, समन्वयक श्री. नाना रमतकार यांनी एका सभेमध्ये केली. दि. 13 फेब्रुवारी 2021 ला राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या प्रा.अरूण बुंदेले यांची ‘आदर्श अभ्यासाचेे तंत्र’ या पुस्तकासह आठ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांचा ‘निखारा’ हा काव्यसंग्रह क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी दि.11 एप्रिल, 2021 ला प्रकाशित होत आहे.
प्रा. बुंदेले यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख एज्युकेशनल नॅशनल अवार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न गौरव पुरस्कार, संत कबीर कविराज पुरस्कार, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कारासह एकवीस राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.प्रा. अरूण बुंदेले यांची परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा. अरुण बुंदेले यांची परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
Contents hide