• Mon. Jun 5th, 2023

प्रशासनाने परवानगी दिल्यास व्यापारी शहरातील बाजारपेठा उघडणार

ByGaurav Prakashan

Mar 3, 2021

अमरावती : २ मार्च,२0२१ रोजी लॉकडाऊन संदर्भात व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी सोबत मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यापार्‍यांच्या समस्या समजून घेण्यात आला. दुकाने उघडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे यावेळी आयुक्त महोदयांनी सांगितले. सद्याच्या स्थितीत कोरोना रुग्ण वाढतच असून त्याला अटकाव घालणे हे प्राथमिक जबाबदारी आहे. चाचण्याचे प्रमाण वाढवण्यात आले असून व्यापारी संघटनेच्या सुचनेवरुन चाचणी शिबीरांचे आयोजन केल्या जाईल. व्यापा-यांच्या ज्या मागण्या असतील त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. व्यापार्‍यांनी नो मास्क नो एंन्ट्री ही मोहीमच राबविली पाहिजे.

आपल्या मार्फत कोरोना रोकथामासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी आयुक्तांनी केले. अमरावती शहरात नव्याने लसीकरण केंद्र तयार करण्यात येवून साठ वर्षावरील व्यक्तींना त्वरीत लस देण्यात येईल तेव्हा या लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा.
चेंबर ऑफ अमरावती महानगर मचर्ंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, उपाध्यक्ष प्रकाश बोके, सचिव घनश्याम राठी, कोषाध्यक्ष जयंत कामदार, सुदीप जैन, अशोक मंत्री, महेश पिजानी, पप्पू गगलानी, सारंग राऊत, विजय भूतडा, राजा चांदवाणी, अशोक राठी बैठकीत उपस्थित होते. यावेळी बैठक आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी आभार मानले. अध्यक्ष सुरेश जैन यांनी यावेळी सांगितले की, प्रशासनाने मार्केट उघडण्यास परवानगी दिली तरच दुकाने उघडण्यात येईल तरी प्रशासनाने सकारात्मकरित्या व्यापार्‍यांना न्याय देण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *