मानोरा : तालुक्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे आज रोजी मोठय़ा प्रमाणात भयकारी आणि संसर्गजन्य असलेल्या कोरोना या आजाराची लागण अनेक नागरिकांना झालेली असल्यामुळे या गावच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येण्याची मागणी महंत रमेश महाराज यांनी एका निवेदनाद्वारे तालुका आपत्ती निवारण कक्षाला केली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी राज्य आणि जिल्हा प्रशासनाचे आवाहन झुगारून हजारोच्या संख्येने जनसमुदायाने पोहरादेवी येथे गर्दी केल्यानंतर लगेच काही दिवसाने अनेक नागरिकांना या भयंकर आजाराचे लागण झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. संसर्गजन्य असलेल्या कोरोना ह्या विषाणूचा प्रसार पोहरादेवी आणि पोहरादेवी ला येणार्या र्शद्धाळूंच्या मार्फत देशात इतरत्र होऊ नये यासाठी प्रशासनाने कोरोना चाचणीचे शिबिरेही दि.२६ फेब्रुवारी पासूनच पोहरादेवी ला चालू केलेली आहेत. आपदा निवारण कक्षाने पोहरादेवी येथील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची कोरोना विषयक चाचणी प्राधान्याने करून घेऊन सामाजिक अंतर राखण्याचे, अति आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे तथा विना मुखाच्छादन नागरिकांनी न फिरण्याविषयी च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून घेण्याची मागणीही महंत रमेश महाराजांनी केली.
पोहरादेवी येथील समस्त ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याची मागणी
Contents hide