• Sat. Jun 3rd, 2023

पॉर्नस्टार असल्यामुळे बॉलिवूडने माझा तिरस्कार केला; सनीचा खुलासा

ByGaurav Prakashan

Mar 12, 2021

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी एक पॉर्नस्टार म्हणून काम करत होती हे सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र, पॉर्नस्टार म्हणून ओळख असणार्‍या एका कलाकाराला बॉलिवूडमध्ये कोणत्या प्रकारची वागणूक दिली जाते. तिला किती संघर्ष करावा लागला. याचा एक व्हिडीओ सनीने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने थोडक्यात तिच्या प्रवासाबद्दल आणि संघर्षाबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये सनीने तिला वयाच्या २१ व्या वर्षी तिरस्काराने भरलेले अनेक ई-मेल येत होते असा खुलासा केला. याशिवाय लोक तिच्यासाठी अपशब्द वापरून कमेंट करत असत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या डान्स मुव्ह्सवरून तिच्यावर टीका केली जात होती. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकांचा पाठिंबा तिला कधीच मिळाला नाही. त्यासोबतच तिला अवॉर्ड सोहळ्यांमधूनही बॉयकॉट केले गेले होते असे या व्हिडीओमध्ये सनी सांगितले आहे.
पुढे सनी म्हणते, मला बराच संघर्ष करावा लागला पण आता मी माझ्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. मला सर्वाधिक प्रसिद्धी बेबी डॉल गाण्याने दिली. आज माझ्याकडे एक सुंदर कुटुंब आहे. मी एक यशस्वी उद्योजिका आहे. मी आज जे आहे त्याचा मला अभिमान वाटतो. मी स्वत:च्या बळावर उभी राहिली आहे. सनीने हा व्हिडीओ जागतिक महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ १0 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, सनी लवकरच अनामिका या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट कोका कोला, रंगीला आणि वीरम्मादेवीमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *