पुसद : शहरालगतच्या माहुर फाट्यावर पोलिसांनी बनावट दारु तयार करणार्या कारखान्यावर धाड घालून १४ लाख २५ हजार ६१0 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुसद शहरात बनावट दारु तयार केली जाते हे निष्पन्न झाले आहे. यामुळे विक्रेत्यासह मद्यपींचे धाबे दणाणले आहे.
पुसद शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय सचिन बेले यांनी गोपनिय माहितीच्या आधारावर काल सायंकाळी माहुर फाट्यावर धाड घातली. यावेळी शुभम मनोज जयस्वाल याच्या जवळ इम्पेरिअल ब्लू कंपनीची दारु मिळून आली. त्याला बाजीराव दाखवताच त्याचा चुलत भाऊ अमोल दिपक जयस्वाल रा. वसंतनगर पुसद हि दोघेही शिरपुर येथे बनावट दारु बनवुन जिल्ह्यात ते विक्री करित असल्याचे सांगितले. त्यांच्या जवळून आयबी, एमडी, आरएस या कंपनीची बनावट दारु बनविण्याकरिता लागणारे साहित्य, स्पीरीट, कलरची प्लास्टिक बॉटल, स्पीरीट काढण्याची मशिन, विविध कंपनीच्या दारु बॉटलचे झाकन, लेबल, दुचाकी व कार असा एकुन १४ लाख २५ हजार ६१0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शुभम जयस्वाल, अमोल जयस्वाल यांचे विरुध्द गुन्हे दाखल करुन ताब्यात घेण्यात आले. या कारवाईने पुसदमध्ये बनावट दारु तयार करुन ती जिल्हाभर विकल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुसदमध्ये बनावट दारु तयार करणार्या कारखान्यावर धाड
Contents hide