- माया आजीची वं पिवशी
- माया मामतेनं भरली
- सप्त रंगानं शिवली
- बुट्ट्या बुटांची वं नक्षी
- साऱ्या विश्वाचा खजिना
- त्या पिवशीत मावेना
- जीव जडला त्यावर
- क्षणभर करमेना
- कमरीले खोचलेली
- जशी तलवार मयानीत
- थरथरत्या हातानं
- स्वप्न भरले पिवशित
- होय कासावीस जीव
- जवा सापडेना पिवशी
- जीवनभराची पुंजी
- जशी हरपली त्या दिवशी
Contents hide
- सौ. शितल राऊत
- अमरावती