• Tue. Jun 6th, 2023

पांदण रस्त्यांवरील चिखल – मातीचा त्रास संपणार – राज्यमंत्री बच्चु कडू

ByGaurav Prakashan

Mar 8, 2021

मुंबई : अमरावती जिल्हातील अचलपूर विधानसभा मतदार संघातील पांदण रस्ते आता कात टाकणार आहेत.राज्याच्या नियोजन विभागाने पांदण रस्त्यांच्या कामांसाठी 8 कोटी रूपये मंजुर केले असून शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणारा चिखल – मातीचा त्रास कायमस्वरूपी हद्दपार होणार आहे.
अचलपूर उपविभागातील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.निधी अभावी रस्तेच होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.ही बाब महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी राज्याच्या नियोजन विभागाच्या सातत्याने लक्षात आणून दिली.इतकेच नव्हे तर खराब पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे पटऊन देण्यात ते यशस्वी ठरले.अखेर नियैजन विभागाने अचलपूर उपविभागातील पांदण रस्त्यांची कामे करण्यासाठी सुमारे 8 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला.पालकमंत्री पांदण रस्ते योजनेंतर्गत ही कामे केली जाणार इहेत.एखाद्या उपविभागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे होण्याचा हा राज्याच्या ईतिहासातील पहालाच प्रसंग आहे. ज्यांच्यासाठी बच्चु कडू यांनी हा निधी खेचून आणला तो शेतकरी वर्ग मात्र चांगलाच सुखावला आहे.अमरावती जिल्ह्यासह जालना,औरंगाबाद,परभणी,हिंगोली,नांदेड आणि वर्धा जिल्ह्याला देखुल हा निधी विशेष बाब म्हणून मंजुर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *