परतवाडा : परतवाडा बस स्थानक परिसरात फेरीच्या कारणावरून दोन ट्रॅव्हल्सच्या गटांमध्ये ९ मार्च रोजी चांगलाच राडा झाला आहे. वादानंतर वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.अचलपुर – परतवाडा या जुळ्या शहरातील अनेक खाजगी बसेस अमरावती परतवाडा फेर्या करत व्यवसाय करतात. ९ मार्च रोजी एक खाजगी बस प्रवासी भरण्या करिता उभी असतानाच दुसरी खाजगी बस येऊन त्याच मार्गावर उभी झाली. त्यामुळे दोन बसेसच्या गटांमध्ये चांगलाच राडा होऊन दगडफेक झाली. यामध्ये खासगी बसेसच्या काचाही फोडण्यात आल्यात यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शे कलीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश भोंडे, निलेश भोंडे यांच्या विरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आलेला आहे. बसस्थानकाच्या बाहेर निघणार्या द्वाराजवळ तीन खासगी ट्रॅव्हल्स यांनी २00 मीटर नो पाकिर्ंग झोनची अमलबजावणी न करता प्रवासी भरण्यासाठी वाहन पाकींग केले. व प्रवासी घेण्याच्या ओघात त्यांनी आपसातमध्ये भांडण करून त्यांनी खाजगी ट्रॅव्हलच्या काचा फोडल्या व बसस्थानकासमोरचा रस्ता बंद केला. त्यामुळे बस बाहेर येण्यास अडचण निर्माण झाली. त्या वेळी तेथे बस वरील उपस्थित कर्मचारी यांनी त्यांना गाड्या काढण्यास सांगितले असता त्यांनी कर्मचारी यांच्या सोबत हुज्जत घातली. याकरिता २00 मिटर पाकिर्ंग झोन ची आल्यात अंमलबजावणी करण्यात यावी. व खासगी ट्रॅव्हल्स एजंट यांना बस स्थानक गेट मध्ये येण्यास प्रतिबंध करावा. अशी तक्रार आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांनी पोलिसांना दिलेली आहे.