अमरावती : स्थानिक किरण नगर नं १ येथील प्रतिष्ठित नागरिक निलेश रामभाऊ कावडकर यांच्या मातोश्री सौ. मनोरमा रामभाऊ कावडकर (वय ६० वर्ष) यांचे दि.८ मार्च ला निधन झाले आहे. स्थानिक हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती रामभाऊजी कावडकर, मुलगा नीलेश, स्नुषा, मुलगी रेखा, सुरेखा, जावाई नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या मनोरमाबाई कावडकर यांच्या अचानक निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Contents hide