• Fri. Jun 9th, 2023

नियमभंग करणार्‍यांवर २0 पथकांची नजर

ByGaurav Prakashan

Mar 7, 2021

अमरावती : संचारबंदीत शिथीलता आणल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी दुकानदार व नागरिकांकडून नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरात परिसरनिहाय २0 विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यात चार उपजिल्हाधिका-यांना प्रत्येकी पाच पथकांमागे एक याप्रमाणे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, प्रत्येक पथकात विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.या पथकांकडून सार्वजनिक स्थळी थुंकणार्‍यांना प्रथम आढळल्यास पाचशे रुपए दंड व दुसर्‍यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न लावल्यास पाचशे रुपए दंड वसूल करण्यात येणार आहे. दुकानदार, भाजीविक्रेते यांनी २ ग्राहकांमध्ये ३ फूट अंतर, माकिर्ंग न करणे आढळल्यास दुकानदाराला आठ हजार दंड व सोशल डिस्टन्स न पाळणा-या ग्राहकाकडूनही ३00 रुपए दंड आकारण्यात येईल. किराणा दुकानदाराने वस्तूंचे दरपत्रक न लावल्याचे आढळल्यास ३ हजार रुपए दंड करण्यात येणार आहे. या सर्व कृती दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. कार्यालय क्षेत्रात कार्यवाहीची जबाबदारी कार्यालयप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांकडून सोमवारपयर्ंत विशेष मोहिम राबविण्यात येईल.
शहरातील विविध भागात नजर
उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले यांच्याकडे नियंत्रण अधिकार्‍याची जबाबदारी आहे. त्याअंतर्गत अमरावती शहरात कोर्ट परिसरासाठी राज्य कर निरीक्षक आशिष तिवारी, स्वाथ्य निरीक्षक दीपक सांगले, एएसआय अशोक गिरी, गाडगेबाबा मंदिर रस्ता परिसरासाठी तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, स्वास्थ निरीक्षक आदेश वानखडे, पोलीस कर्मचारी दिगंबर चोरपगार, भाजीबाजारासाठी सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, स्वास्थ निरीक्षक छोटू पटेल, पोलीस कर्मचारी दिगंबर इंगळे, मोची गल्ली परिसरासाठी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, पोलीस कर्मचारी दिनेश म्हाला यांची नेमणूक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *