लखीसराय: बिहार राज्यातील लखीसरायच्या कजरा गावात 5 ते 7 वर्षीय चिमुकलींना चॉकलेट देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचे वय 50 वर्षे असून, तो आपल्या दुकानावर लहान मुलींना बोलवायचा आणि त्यांना चॉकलेट देऊन अत्याचार करायचा. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे.
सोमवारी संध्याकाळी दोन मुलींची तब्येत अचानक खराब झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना आरोपी प्रकाश तांती याच्या कृत्याबाबत सांगितले. त्या मुलींना आपल्यासोबत नेमके काय होत आहे, हेदेखील माहित नव्हते. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात गोंधळ झाला. त्यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सध्या या सर्व मुलींची वैद्यकीय चाचणी होत आहे. गावातील लोकांचा आरोप आहे की, आरोपीने 20 मार्चला 2 मुलींवर अत्याचार केला आहे.
धक्कादायक : 10 दिवसात 8 मुलींवर बलात्कार
Contents hide