• Mon. Jun 5th, 2023

धकधक गर्ल माधुरी दीक्षितची वेबसीरिजमध्ये एन्ट्री

ByGaurav Prakashan

Mar 5, 2021

मुंबई : धकधक गर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच फाइडिंग अनामिका या वेबसीरीजमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. माधुरीने याबाबतची माहिती स्वत:च्या टविटर अकांऊटवरून दिली आहे. नेटफ्लिक्स इंडियाने २0२१ या वर्षात रिलीज होणार्‍या चित्रपटाची आणि वेबसीरीजची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. या यादीत अनेक मोठमोठय़ा कलाकारांच्या चित्रपट आणि वेबसीरीजची नावे समोर आली आहेत. यामुळे अनेक दिग्गज कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने एन्ट्री करत आहेत.
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे या यादीत पहिले नाव आहे. माधुरी दीक्षित फाइडिंग अनामिका या वेबसीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही माहिती स्वत: माधुरीने ट्विटरवरून दिली आहे. दिग्दर्शन करण जोहरच्या डिजीटल प्रोडक्शन हाऊसचे ५ बिग बजेट प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहेत. यात माधुरीच्या या डिजिटल डेब्यूचा समावेश आहे.
माधुरी दीक्षितने ह्यकलंकया चित्रपटानंतर काही डान्स शोमधून जजच्या भूमिकेत झळकली होती. मात्र, आता माधुरी एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेत. फाइडिंग अनामिका या वेबसीरिजशिवाय रविना टंडनचा अरण्यक वेबसीरिज आणि कार्तिक आर्यनचा धमाकाहे चित्रपट रिलीज होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *