मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त ‘सक्षमीकरणातून निर्भयतेकडे’ या विषयावर महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच “न्यूज ऑन एअर” या ॲपवरून सोमवार दि. 8 व मंगळवार 9 मार्च रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गेल्या वर्षभरात महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात आलेले निर्णय, महिला धोरण, बालविवाहाचे समाजातील प्रमाण कमी करण्यासाठीचे प्रयत्न, मनोधैर्य योजना, निराश्रित महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आधारगृहे, अंगणवाड्यांचा विकास करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, महिला सक्षमीकरण आदी विषयांची माहिती ॲड.ठाकूर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
Contents hide