• Sun. Jun 4th, 2023

दारव्हा तालुक्यातील २३ शाळांची कामे विनानिविदा …!

ByGaurav Prakashan

Mar 19, 2021

दारव्हा : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २0१९-२0 मधील मंजूर असलेल्या शाळा इमारत बांधकाम तालुक्यातील तेवीस गावांमध्ये सुरू असून ही सर्व बांधकामे विनानिविदा केल्या जात आहे एका शाळेच्या इमारतीसाठी सदर योजनेमधून ७ लाख ७७ हजार रुपये मंजूर झाले असून कुठल्याही कामाची रक्कम ३ लाखाच्या वर गेल्यास निविदा काढणे अनिवार्य असतानासुद्धा तालुक्यातील २३ गावांमध्ये विनानिविदा शाळा इमारतीच्या बांधकामांना सुरुवात करण्यात आली असून त्यामधील काही कामे स्लॅब लेवल पयर्ंत झालेली आहे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाळा इमारतीचे बांधकाम केल्या जात असल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये चचेर्चा विषय झाला आहे.
तालुक्यातील २३ गावांमध्ये नवीन शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे सदर कामाची निविदा बोलावून यांच्या कंत्राटदाराची किंवा कामगार संस्थांचे जास्त प्रमाणात बिलो असलेल्या कंत्राटदारांना काम देणे अनिवार्य होते परंतु ग्रामपंचायत आणि शाखा अभियंता यांनी शासनाच्या कुठल्याही नियमाची पूर्तता न करता सर्व शासकीय नियम पायदळी तुडवीत मनमानी पद्धतीने शाळा बांधकामांना सुरुवात केलेली आहे संपूर्ण कामाची रक्कम ३ लाखाच्या वर गेल्यास निविदा काढणे बंधनकारक असतानासुद्धा दारव्हा पंचायत समिती याला अपवाद ठरले आहे अनुभव शून्य असलेल्या लोकांना शाळा इमारतीचे बांधकाम देण्यात आलेले आहे त्यामुळे शाळेच्या इमारतीचे बांधकाम व विकास कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे हा सर्व प्रकार तालुक्यामध्ये राजरोसपणे सुरु आहे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनी संगनमत करून त्या विकास कामांमधील मलिदा लाटण्याचा प्रकार चालविला आहे सदर प्रकार अतिशय गंभीर असून या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष घालून सदर प्रकरणाची चौकशी करावी व दोषी असलेल्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *