मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, असा प्रश्न विद्यार्थी पालकांमध्ये उपस्थित झाला होता. दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. दोन्ही लेखी परिक्षेसाठी अर्धा तास अधिक मिळणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच, दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरू असलेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत पत्रकार परिषद घेतली आहे. विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेसाठी साडे तीन तासांचा वेळ दिला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना १ तास वाढवून दिला आहे. तसेच ठरलेल्या वेळापत्रकारनुसारच परीक्षा होणार असून लेखी परीक्षा ही ऑफलाईन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबत कोरोना प्रादुर्भावाची काळजी घेत वर्ग खोल्या कमी पडल्या तर बैठक व्यवस्था दुसरीकडे करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २0 मे दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे एप्रिल-मे २0२१ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक याआधी जाहीर करण्यात आले आहे.
दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच-वर्षा गायकवाड
Contents hide