• Sun. May 28th, 2023

थायरॉइडमुळे डोळ्यांच्या तक्रारीही उद्भवू शकतात…!

ByGaurav Prakashan

Mar 14, 2021

आजकाल इतर काही आजारांबरोबर थायरॉइडचंप्रमाणही वाढताना दिसत आहे. वास्तविक थायरॉइडचे अनेक दुष्परिणाम आपण जाणतो पण थायरॉइडमुळे डोळ्यांच्या तक्रारीही उद्भवू शकतात याची नोंद घ्यायला हवी. जाणून घेऊ या, या विकाराची कारणं..
थायरॉइडमुळे नेत्रविकार झाल्यास शरीरातल्या रोगप्रतिकारक पेशी थायरॉइड ग्रंथींवर आक्रमण करतात. यामुळे थायरॉइड हार्मोन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात स्रवतात. यामुळे डोळ्यांभोवतालच्या टिश्यूंना सूज येते. थायरॉइड ग्रंथींमधून हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्रवत असल्यास ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. डोळ्यांच्या आसपासचे टश्यू सुजल्यामुळे डोळा सुजल्यासारखा दिसतो. डोळ्यातून पाणी येत राहतं. फोटोफोबिया किंवा डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्यास त्रास होतो. कोरडेपणामुळे निर्माण होणार्‍या डोळ्यांच्या समस्या डोकं वर काढतात. डोळ्यांवर ताण जाणवू लागतो. दोन वस्तू असल्याचा भास होतो. डोळे आकुंचन पावतात आणि दृष्टी अधू होते. यामुळे डोळ्यांमध्ये अल्सर होण्याची शक्यताही वाढते. या आजारात बुब्बुळं बाहेर आल्यासारखी वाटतात. पापण्यांलगतचा भाग आकुंचन पावतो. या सर्व लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे.आजकाल इतर काही आजारांबरोबर थायरॉइडचंप्रमाणही वाढताना दिसत आहे. वास्तविक थायरॉइडचे अनेक दुष्परिणाम आपण जाणतो पण थायरॉइडमुळे डोळ्यांच्या तक्रारीही उद्भवू शकतात याची नोंद घ्यायला हवी. जाणून घेऊ या, या विकाराची कारणं…

थायरॉइडमुळे नेत्रविकार झाल्यास शरीरातल्या रोगप्रतिकारक पेशी थायरॉइड ग्रंथींवर आक्रमण करतात. यामुळे थायरॉइड हार्मोन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात स्रवतात. यामुळे डोळ्यांभोवतालच्या टिश्यूंना सूज येते. थायरॉइड ग्रंथींमधून हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्रवत असल्यास ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. डोळ्यांच्या आसपासचे टश्यू सुजल्यामुळे डोळा सुजल्यासारखा दिसतो. डोळ्यातून पाणी येत राहतं. फोटोफोबिया किंवा डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्यास त्रास होतो. कोरडेपणामुळे निर्माण होणार्‍या डोळ्यांच्या समस्या डोकं वर काढतात. डोळ्यांवर ताण जाणवू लागतो. दोन वस्तू असल्याचा भास होतो. डोळे आकुंचन पावतात आणि दृष्टी अधू होते. यामुळे डोळ्यांमध्ये अल्सर होण्याची शक्यताही वाढते. या आजारात बुब्बुळं बाहेर आल्यासारखी वाटतात. पापण्यांलगतचा भाग आकुंचन पावतो. या सर्व लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *