तिवसा : अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी,सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे. आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची नवीन अग्निशमन दलाची गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.यात नगरपंचायतचे तीन कर्मचारी या आगीत किरकोळ रित्या जखमी सुद्धा झालेत.तर ही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती ती नियंत्रना बाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
तर ही आग अनियंत्रित झाल्याने आग विझविण्यासाठी ही गाडी आली होती. मात्र ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली,यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे सह उपस्थित होते.
तिवसा येथे जंगलाला आग; अग्निशमनदलाची गाडी जळून खाक
Contents hide