अमरावती : उपआयुक्त रवी पवार यांच्या अध्यकक्षतेखाली १९ मार्च,२0२१ रोजी रॅपिड अँंन्टिजेन लॅब प्रतिनिधीची बैठक महानगरपालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर, सर्व पॅथोलॉजी डॉक्टर उपस्थित होते. या बैठकीत उपआयुक्त यांनी सूचना दिल्या की, डाटा एंन्ट्री होत असतांना रुग्णांचे पूर्ण नाव, पत्ता्, मोबाईल क्रमांक घेण्यात यावा व मोबाईल क्रमांकांची खात्री करूनच घेण्यात यावा. शहरातील टेस्ट करणा-या लॅब येथे काम करणार्या सॅंम्प्ल बॉय यांना फोटोसह ओळख पत्र देण्यात यावे. टेस्ट केलेल्या रुग्णांची संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात यावे. शहरातील लॅब मध्ये टेस्टट करणार्या रुग्णांनी रिपोर्ट येई पयर्ंत घरा बाहेर पडु नये पडल्योस दंडात्माक कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात सॅंम्प्ल घेणार्या सर्व लॅब यांचा डेटा महानगरपालिका व जिल्ह शल्य चिकित्सक कार्यालयात दैनंदिन देण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. तसेच सर्व नोंदी आय.सी.एम.आर. च्या पोर्टलवर रिअल टाईम अद्यावत करण्यात यावा. शहरामध्ये अनाधिकृत लॅबद्वारे रॅपिड अँंन्टीसजेन टेस्ट करण्यात येत असल्याचे निर्देशनास येत आहे. तसेच शैक्षणिक पात्रता नसणार्या लोकांकडुन रुग्णांचे स्वॅतब घेण्यात येत असल्याचेही निर्देशनास येत आहे. त्यामुळे यापुढील शहरामध्ये मनपातर्फे तपासणी करुन अशा बोगस लॅब व लॅब टेक्निशियन यांचेवर कारवाई करण्या्त येणार आहे.
तपासणी करणार्या रुग्णांचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाची नोंद घ्यावी
Contents hide