अमरावती : अमरावती कोषागारातील नवृत्तीवेतन शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांत कोरोनाची लागण झाल्याने कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे मार्च २0२१ चे नवृत्तीवेतन अदा करण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता असून, सर्व नवृत्तीवेतनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी कंवलजीतसिंह चौहान यांनी केले आहे.कोषागारातील काही अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यातील काही रजेवर होते व काही अद्यापही आजारामुळे रजेवर आहेत. त्याशिवाय, मार्चच्या अखेरच्या आठवड्यात व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे मार्च महिन्याचे नवृत्तीवेतन अदा करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. तरी ही अडचण लक्षात घेऊन सर्व नवृत्तीवेतन व कुटुंब नवृत्तीवेतनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चौहान यांनी केले आहे.
ट्रेझरी कर्मचार्यांना कोरोना; नवृत्ती वेतन अदा होण्यास विलंबाची शक्यता.!
Contents hide