झेडपी अध्यक्षांच्या भेटीत २८ आरोग्य कर्मचारी गैरहजर

यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागात मंगळवारी अध्यक्ष कालिंदा पवार यांनी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. त्यामुळे गैरहजर आढळलेल्या तब्बल २८ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये नियमित १७, प्रतिनियुक्तीवरील ३, एनआरएचएमचे ७ आणि वर्ग चारच्या एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. काही कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहोचल्याने अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. या कर्मचार्‍यांवर कारवाईचे आदेश अध्यक्षांनी डीएचओंना दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात योगा केंद्र ओट्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यातील निधीबाबत स्थायी समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित झाल्यावरही समाधानकारक उत्तरे दिले जात नाही. त्यामुळे चौकशीसाठी समिती गठीत निर्देश दिले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!