पुसद : आरोपी पती व सासरा यांनी मृत छाया अमोल देशमुख हिला मारहाण करून जिवंत जाळल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येक ५00 दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधिश श्रीमान एस.बी. गावंडे यांनी सुनावली.
मृतक छाया हिचे लग्न आरोपी अमोल देशमुख याच्यासोबत २00९ मध्ये झाले होते. लग्नानंतर तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नवरा अमोल देशमुख सासरा विजय व सासू अन्नपूर्णाबाई मृतक हिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. दि.१५/0९/२0१२ रोजी छाया हिने तिचे आईस फोन करून सर्व आरोपी मारहाण करीत असल्या बाबत माहिती दिली व थोडया वेळानी फोन करते असे सांगितले परंतु रात्री ११ वाजता छाया जळाली असल्या बाबतीतची माहिती फोनवरून छाया हिचे काकास दिली. मयत छाया हिचे ओरडण्याचा आवाज आल्याने गावातील पोलीस पाटील घटनास्थळी गेले असता छाया जळत असल्याचे व सर्व आरोपी छाया हिचे थोडे दूर जवळच बसून असल्याचे त्यांना दिसले. पोलिस पाटलांनी जवळच असलेल्या पाण्याचे टाकी मधील पाणी मृतक हिचे अंगावर टाकून आग विजवली आणि पोलिस स्टेशन पोफळी येथे घटनेची माहिती दिली. मृतक छाया हिची माहेर कडील नातेवाई व काका यांनी घटनास्थळी पाहणी केली असता सर्व आरोपींची मयत छाया हिस मारल्याचा संशय आल्याने छाया हिचे काका तानाजी चव्हाण पोलिस स्टेशन पोफाळी येथे आरोपी पती अमोल देशमुख, सासरा विजय देशमुख तर सासू अन्नपूणार्बाई देशमुख यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली. आरोपीविरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून भादंविचे कलम ३0२ ाुसार गुन्हा नोंद करण्या आला. मृतक छाया हिचे शव विच्छेदन अहवालामध्ये मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचे आढळून आले. तसेच तिचे शरीरावर मारहाणीच्या गळा दाबल्याच्या खुणा मिळून आल्यात व जिवंतपनीच तिला केरोसीन टाकून जाळले असल्याचे वैद्यकीय तपासणी मध्ये निष्पन्न झाले. तपास अधिकारी डी. सी. राठोड (स.पो.नि.) यांनी साक्षदारांचे बयाण नोंदवून तपास पूर्ण झाल्या नंतर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षदारांची साक्ष घेण्यात आली. तसेच आरोपी तर्फे गावातील एका इसमा विरुद्ध मृतक हिने पूर्वी जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती त्या इसमानेच खून केला असल्या ची शक्यता असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला होता. परंतु त्या बाबतीमध्ये आरोपी कोणताही ठोस पुरावा देऊ न शकल्यामुळे परिस्थिती जन्य पुरावा व वैद्यकीय अधिकारी शरद कुचेवार यांची झालेली साक्ष व सरकारी वकिल महेश निर्मल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी पती अमोल देशमुख आणि सासरा विजय देशमुख यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५00 दंडाची शिक्षा सुनावली तर सासू अन्नपूणार्बाई हिला निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पो.हे. कॉ. दिलीप राठोड व पो. कॉ. राहुल माकंर्डे यांनी काम पाहिले.
जिवंत जाळल्याप्रकरणी पती व सासरास जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येक ५00 दंडाची शिक्षा
Contents hide