• Sat. Sep 23rd, 2023

जिल्ह्यातील १६ रेतीघाटांचा २२ कोटींमध्ये लिलाव

यवतमाळ : जिल्ह्यातील १६ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला असून, यासाठी सर्वोच्च बोली एकूण २२ कोटी ८२ लाख ५७ हजार 0६४ रुपये लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन २0१९ -२0 मध्ये या सर्व रेतीघाटासाठी निश्‍चित केलेली सरकारी रक्कम १४ कोटी ३ लाख ९३ हजार रुपये होती. निश्‍चित केलेल्या दरापेक्षा ८ कोटी ७८ लाख रुपये या माध्यमातून शासनाकडे अतिरिक्त जमा होणार आहे.
बाभूळगाव तालुक्यातील भैयापूर रेतीघाटाची सर्वोच्च बोली ८७ लाख ६८ हजार ५00 रुपये, नागरगाव रेतीघाट ५३ लाख ५३ हजार ५00 रुपये, आर्णि तालुक्यातील साकूर – १ रेतीघाटासाठी १ कोटी २५ लाख ९५ हजार ५५५ रुपये, साकूर – २ रेतीघाटासाठी १ कोटी ११ लाख ८७ हजार ९७२ रुपये, राणीधानोरा – २ रेतीघाटासाठी ३ कोटी १ लाख ८३ हजार रुपये, राळेगाव तालुक्यातील जागजाई रेतीघाट २ कोटी २५ लाख रुपये, रोहिणी – २ रेतीघाटासाठी २ कोटी ८७ हजार १४ लाख १४१ रुपये, घाटंजी तालुक्यातील विलायता रेतीघाट ८९ लाख ५ हजार रुपये, माणूसधारी रेतीघाटासाठी २ कोटी ३ लाख ५ हजार ५५५ रुपये, वणी तालुक्यातील सुजार्पूर रेतीघाट २९ लाख ५0 हजार रुपये, भुरकी – १ रेतीघाटासाठी १ कोटी ९९ लाख ९६ हजार ७८६ रुपये, उमरखेड तालुक्यातील साखरा रेतीघाट ९0 लाख ५00 रुपये, चालगणी रेतीघाट १ कोटी ७१ लाख ९५ हजार ५५५ रुपये, कळंब तालुक्यातील औरंगपूर रेतीघाट ५५ लाख ६८ हजार ५00 रुपये, मारेगाव तालुक्यातील आपटी उत्तर रेतीघाट १ कोटी ३९ लाख ३२ हजार ५00 रुपये आणि महागाव तालुक्यातील थार खुर्द रेतीघाटासाठी सर्वोच्च बोली १ कोटी ११ लाख रुपये लावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे लिलाव झालेल्या रेतीघाटावर सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपयर्ंतच रेतीची उचल करता येईल. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपयर्ंत कोणतेही वाहन किंवा कामगारांनी रेतीघाटावर प्रवेश केल्यास कलम १४४ नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,