अमरावती : जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ४ मार्च रोजी ९ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला.६७३ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यत ३७ हजार ७९६ कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.६ हजार ७३८ एॅक्टीव्ह रुग्ण असून ३0 हजार ५0९ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.सतत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे संपूर्ण जिल्हयात तणावाचे वातावरण असुन एकीकडे रोजगारासाठी नागरिकांची धडपड तर दुसरीकडे व्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाची धावपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सततच्या वाढत असलेल्या कोरोनाबाधितांवर अंकुश लावणे प्रशासनाना देखिल कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. ८ मार्च पर्यत लॉकडाऊनचा कालावधी असतांना देखिल रुग्णसंख्येमध्ये सातत्याने भर पडत आहे.त्यामुळे ८ मार्च नंतर काय असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून दर दिवसाला ८ किंवा १0 नागरिकांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे.गेल्या काही दिवसापासुन जिल्हयात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पहिल्या वेळेपेक्षाही दुसर्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाने जिल्हयात आठ दिवसाचा लाऊकडाऊन घोषीत केला असतांना देखिल र्मयादित वेळेत खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात प्रचंड गर्दी होत असल्याचे धक्कादायक अदयापही दिसून येतच आहे. त्यातच ज्येष्ठांच्या लसीकरणावरून जिल्हयातील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम असुन लस घ्यावी की नाही अशा व्दीधा मनस्थितीत नागरिक अडकल्याचे दिसत आहे.४ मार्च रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६७३ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३७ हजार ७९६ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. मृतकांची संख्या देखिल सातत्याने वाढत असून ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत ५४९ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत त्यामुळे जिल्हयात मृत्यू दर हा १.४५ वर पोहोचला आहे. ६ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरू असून ३0 हजार ५0९ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. डब्लींग रेट ३७ असून रिकव्हरी रेट हा ८0.७२ इतका आहे.
जिल्ह्य़ात ९ रुग्णाचा मृत्यू, ६७३ पुन्हा पॉझिटिव्ह
Contents hide