अमरावती : ८ मार्च पर्यत प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर देखिल जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच आहे. ३ मार्च रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६७१ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यत जिल्हयात ३७ हजार १२३ रुग्णांना कोरोनाची लागन झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत होणार्या रुग्णाचा आकडा देखिल दिवसेंदिवस वाढत असून आज ७ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत ५४0 रुग्ण दगावले आहेत. ६ हजार पेक्षा जास्त रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असून ३0 हजार ६७ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम हा महाराष्ट्र राज्यावर सर्वाधिक झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.त्यातही अमरावती जिल्हयामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यासह देशाचे देखिल लक्ष अमरावती जिल्हयाकडे केंद्रीत झाले आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखिल अधिवेशना दरम्यान अमरावतीचा विशेष उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. अमरावती जिल्हयात मागिल १ महिन्यापासुन कोरोना रुग्णांचा आकडा हा झपाटयाने वाढत असुन याव अंकुश लावण्यासाठी प्रशासनाने ८ मार्च पर्यत लाकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊन संपायला आता केवळ ५ दिवस शिल्लक उरले असतांना देखिल कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होतांना दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हयात लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता सध्याच्या परीस्थितीवरून दिसुन येते.शहरात रोजगाराचा प्रश्न प्रमुख्याने निर्माण झाला असुन मजुर वर्गासह व्यापारी वर्गामध्ये मोठया प्रमाणात नाराजी असल्याचे पाहिल्या जात आहे. विविश संघटनानी लॉकडाऊनला विरोध केल्यामुळे अशा संघटनाच्या विरोधात प्रशासनाकडून कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वातावरणातील बदलाचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर पहावयास मिळत आहे. सर्दी,खोकला, ताप अशा सारख्या समस्या या सहज झाल्यामुळे जिल्हयातील जवळपास सर्वच रुग्णालये ही रुग्णांनी तुडूंब भरलेली दिसून येत आहे.३ मार्च रोजी आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६७१ रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी जिल्हयात आतापर्यत ३७ हजार १२३ कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ७ रुग्णांच्या मृत्युसह एकूण ५४0 रुग्णांचा कोरोनामुळे अंत झाला आहे. ६ हजार पेक्षा जास्त रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून ३0 हजार ६७ रुग्णाना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आलाआहे.