अमरावती : जिल्हयात ६ मार्चलाच अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमी जास्त प्रमाणात घट व वाढ पहावयास मिळत आहे. ८ मार्च रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४६२ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३९ हजार ९८६ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत ५६९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. ६ हजार ४४९ रुग्णांवर उपचार सुरू असून ३२ हजार ९६८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हयात रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ८२.४५ इतका आहे.
गेल्या काही दिवसापासुन जिल्हयात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पहिल्या वेळेपेक्षाही दुसर्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाने जिल्हयात आठ दिवसाचा लाऊकडाऊन घोषीत केला होता मात्र ६ मार्च रोजीच लॉकडाऊन हटवुन निर्बंध लागु करण्यात आले.तरी देखिल र्मयादित वेळेत खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात प्रचंड गर्दी होत असल्याचे धक्कादायक अदयापही दिसून येतच आहे. त्यातच ज्येष्ठांच्या लसीकरणावरून जिल्हयातील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम असुन लस घ्यावी की नाही अशा व्दीधा मनस्थितीत नागरिक अडकल्याचे दिसत आहे.८ मार्च रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४६२ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३९ हजार ९८६ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत ५६९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. ६ हजार ४४९ रुग्णांवर उपचार सुरू असून ३२ हजार ९६८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हयात रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ८२.४५ इतका आहे.
जिल्ह्य़ात ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह, ७ रुग्णांचा मृत्यू
Contents hide