• Sun. Jun 11th, 2023

जिल्ह्य़ात कोरोनामुळे १0 रुग्णांचा मृत्यू,६९९ पॉझिटिव्ह

ByGaurav Prakashan

Mar 2, 2021

अमरावती : जिल्हयात लॉकडाऊन असतांना सुध्दा कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीरून दिसुन येत आहे. विशेष म्हणजे मृतांचा आकडा देखिल तिव्र गतीने वाढत असल्यामुळे संपूर्ण जिल्हयावर कोरोनाचे सावट पहावयास मिळत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६९९ कोरोना रुग्ण आढळून आले असून ३५ हजार ८१६ कोरोनाग्रस्तांची आतापर्यत नोंद करण्यात आली आहे. मृतांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वृध्दी होत असून १ मार्च रोजी १0 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन आतापर्यत एकूण ५२१ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे. ५ हजार पेक्षा जास्त रुग्णांवर कोविड तसेच क्वारटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून २९ हजार ५३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्हयावर दिवसेंदिवस कोरोनाचे सावट गळद होत असल्याचे दिसुन येत आहे. विशेष म्हणजे र्मयादित संचारबंदीचा कुठलाच परिणाम हा कोरोनावर होत नसुन रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वृध्दी होत आहे. जिल्हयाती नागरीक अदयापही कोरोना या महामारीचे गांभीर्य संमजुन घेत नसुन मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग या नियमांचे सर्रास उल्लंधन होत आहे.इतक्या भयावह परीस्थितीतही अनेक संघटना या लॉकडाऊनच्या विरोधात वक्यव्य करीत असुन व्यापारी बाजारेपठा सुरू करण्याची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न हा महत्वपूर्ण असला तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याबाहेर जाण्याआधी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला देखिल अनेक सुज्ञ नागरीक देत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसापासुन जिल्हयात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पहिल्या वेळेपेक्षाही दुसर्‍या लाटेमध्ये रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाने जिल्हयात आठ दिवसाचा लाऊकडाऊन घोषीत केला असतांना देखिल र्मयादित वेळेत खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात प्रचंड गर्दी होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसुन येत आहे. इतक्या भयावह परीस्थितीतही अनेक अमरावतीकरांमध्ये बेजबाबदारपणा दाटुदाटू भरला आहे. कोरोना हा प्रकारच मुळात नसल्याचे अनेकांचे मत असल्यामुळे मास्क तसेच सोशल डिस्टन्सींग अशा नियमांचे दिवसा ढवळया उल्लंधन करीत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्हयात वाढत्या कोरोना रुग्णाबरोबरच मृतांचा आकडा देखील झपाटयाने वाढत चालला आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील कमी झाला झाल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे जनसामान्याचे हाल होत असुन रोजगाराचा प्रश्न पुन्हा एैरणिवर आला आहे. नागरिकांच्या अशाच बेजबाबदार वागणुकीमुळे जिल्हयात पुन्हा लाकडाऊनचा काळ वाढविण्याची भिती निर्माण झाली आहे. १ मार्च रोजी जिल्हयात ६९९ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३५ हजार ८१६ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयात १0 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन ५२१ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. ५ हजार पेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. तर २९ हजार ५३१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *