अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपणासाठी स्थापित सुविधेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हाधिका-यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अतुल नरवणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, उपचारप्रणाली व यंत्रणा अद्ययावत करण्याबरोबरच रुग्णालयांत स्वच्छता व आवश्यक तिथे इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात यावी. रुग्णालयांत दुर्धर आजारावर, तसेच अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतात. याबाबत संबंधितांना माहिती दिली पाहिजे. यावेळी काही रुग्णांशी श्री. नवाल यांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.
रुग्णालयातील स्वच्छतागृहे, सर्व वार्डातील दारे खिडक्यांची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी. स्वच्छ पेयजलासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिका-यांकडून ‘इर्विनची’ पाहणी
Contents hide