अमरावती : जिल्हयात पुन्हा ६५१ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत ३८ हजार ४४७ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.३ रुग्णांचा मृत्यूसह एकूण ५५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ७ हजार १४६ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.३0 हजार ७४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.विशेष म्हणजे प्रशासनाने ६ मार्च पासुन लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला असुन निर्बंध कायम ठेवले आहेत.
जिल्हयात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना प्रशासनाने जिल्हयातील लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेवून काही प्रमाणात शिथिलता आणुन निर्बंध कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतांना जिल्हयात कोरोना अनियंत्रीत होता आता मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कोरोना रुग्णांची सख्या वाढू शकते याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.अशा परीस्थितीत कोरोना रुग्णांचा आकडा हा नियंत्रणाबाहेर गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न देखिल अनेक नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहे. जिल्हयात अदयापही कोरोनावर पूर्णपणे अंकुश लावण्यात आला नसतांना नागरिकांना वावरण्यासाठी देण्यात येणारी सुट ही कोरोनाला अनुकुल ठरू शकते हे सध्याच्या परीस्थितीवरून दिसून येत आहे. बाजारपेठा, समारंभ तसेच इतर भेटीगाठींच्या माध्यमातुन कोरोनाचा होणार प्रसार हा अमरावतीकरांसाठी घातकच ठरणार हे मात्र नक्की.५ मार्च रोजी आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात नव्याने ६५१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून जिल्हयात आतापर्यत ३८ हजार ४४७ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे.३0 हजार ७४९ रुग्णाना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ७ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. ३ रुग्णांचा मृत्यू झाला असुन आतापर्यत ५५२ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे.
जिल्हयात पुन्हा ६५१ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
Contents hide