अमरावती : जिल्हय़ात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना नागरिकांची बाजारपेठामध्ये होत असलेल्या गर्दी विषयी प्रशासना चिंतातूर दिसून येत आहे. याच गर्दीचा उद्रेक हा कोरोनाचा स्फोट करण्यास पुरक ठरू शकत याची शक्यता बाळगुन आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.२५ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३४२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४६ हजार ९९७ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. आज ६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत ६४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजारच्या जवळपास रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ४१ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरूच असून अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात चढ उतार पहावयास मिळत आहे. पण साधारणत तिनशेच्यावरच रुग्ण आढळुन येत असल्यामुळे प्रशासनासमोरील आवाहन अदयापही कायम असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. जिल्हय़ात लसीकरणाला वेग आला असला तरी अदयापही अनेकांमध्ये लसीकरणा विषयी मेाठया प्रमाणात गैरसमज असल्याचे दिसून येत आहे.शहरी तसेच ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणाची मोहीम मोठया प्रमाणात राबविल्या जात असतांना अदयापही अनेक वयोवृध्द हे लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच जिल्हयात अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरीकहे राजरोसपणे बाजारपेठामध्ये फिरत असतांना दिसुन येत असून कोरोनाला बळ देण्याचे काम करीत आहे. २५ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३४२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४६ हजार ९९७ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. आतापर्यत ६४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजारच्या जवळपास रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ४१ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हय़ात ६ रुग्णांचा मृत्यू, ३४२ पॉझिटिव्ह
Contents hide