अमरावती : जिल्ह्य़ात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट पहावयास मिळाली असून, ३३६ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जिल्ह्य़ात आतापर्यंत ४४ हजार ५५८ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे.
४ हजार ३६४ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून ३९ हजार ५३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्य़ात कोरोनामुळे मृत्यू होणार्याचा मृत्यू दर हा १.३९ इतका असून डब्लिंग रेट ३२.५ तर रिकव्हरी रेट हा ८८.८१ इतका आहे. राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठय़ा प्रमाणात परिणाम पहावयास मिळत आहे. मुंबई, नागपूर,पुणे यासह इतर शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून अनेकांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे कोरोना लस ही कितपत उपायकारक यावर प्रश्न चिन्ह असून अद्यापही असंख्य नागरिक हे कोरोना लसीकरणापासून दूर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्य़ात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अनेक व्यवसायावरून निर्बंध उठविण्यात आले आहे. परिणामी नागरिकांची बाजारपेठामध्ये खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे.विशेष म्हणजे कोरोनाला पोषक वातावरण निर्मिती ही गर्दीच्या माध्यमातून होत असून कोरोना रुग्णांच्या वाढीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे सध्यास्थितीवरून दिसून येत आहे.
१९ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात ३३६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून ४४ हजार ५५८ रुग्ण हे आतापर्यत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.४ हजार ३६४ एक्टिव्ह रुग्ण असून ३९ हजार ५३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत ६२१ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे.
जिल्हय़ात ३३६ रुग्ण पॉझिटिव्ह, आतापर्यंत ६२१ रुग्णांचा मृत्यू
Contents hide