• Thu. Sep 28th, 2023

जिल्हय़ात कोरोना रुग्णांची सख्या घटली,१0८ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्हयासाठी आज बरेच दिवसापासुन शुभा वार्ता समोर आली असून कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठया प्रमाणात घट पहावयास मिळाली. ३0मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १0८ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४८ हजार ३७६ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. आतापर्यत ६६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २ हजारच्या जवळपास रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.४३ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यापासुन जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनासह नागरिक सुध्दा हैरान झाले होते.दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा सुरूवातीच्या काळात अमरावती जिल्हयात दिसून आला. दर दिवसाला ५00 पेक्षा जास्त रुग्णासह मृतकांचा आकडा देखिल वाढत चालला होता. रुग्ण संख्या आटोक्यात येणार की नाही याची भिती अमरावतीकरांना वारंवार भेडसावत होती. मात्र अखेर वाढत्या रुग्णसंख्येवर आरोग्य विभागाच्या अथक पर्शिमामुळे नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.३0 मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १0८ रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी ४८ हजार ३७६ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ६६४ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून २ हजारच्या जवळपास रुग्णावर उपचार सुरू आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधिंच्या संख्येवर काही अंशी नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,