मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच रुही या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ११ मार्चला रुही सिनेमा चित्रपटगृहात धडकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता मात्र चांगलीच ताणली गेली आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शमार्ची खास विनोदी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तर पनघट हे रुही सिनेमाचं पहिलं गाणं आयाधी रिलीज झालं होतं. त्यानंतर नुकतच या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज झालंय. हे एक आयटम साँग असून जान्हवीचा बोल्ड अंदाज या गाण्यात दिसून येतोय. जान्हवी कपूरचं हे पहिलंच आयटम साँग आहे. नदियो पार हे जान्हवीचं पहिलंचं आयटम साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतं आहे. या गाण्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. या गाण्यातील जान्हवीच्या अदाकारीने तर चाहत्यांना पुरतं घायाळ केलंय.
गोल्डन ड्रेसमधला जान्हवीचा हॉट लूक आणि तिच्या जबरदस्त डान्सने अनेकांना वेड लावलं आहे. जान्हवीने तिच्या आयटम साँगचा व्हिडीओ इन्स्टाग्रावरही पोस्ट केलाय. या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलंय. अभिनेत्री कतरिना कैफने हार्ड आणि फायरचं इमोजी कमेंटमध्ये देत जान्हवीच्या डान्सला पसंती दिलीय. २00४ मध्ये नदियो पार या गाण्यानं धुमाकुळ घातला होता. यानंतर रुही सिनेमासाठी हे गाणं रीकंपोज करण्यात आलंय. शामूरनेच हे गाणं पुन्हा गायलं आहे.
जान्हवी कपूर एक उत्तम डान्सर आहे. सोशल मीडियावर जान्हवी तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. याआधी रिलीज झालेल्या पनघट या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. या गाण्यात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शमार्चे ठुमके पाहायला मिळाले.
वरुण धवनची जान्हवीला टक्कर!
रुही हा हॉरर कॉमेडी सिनेमा असून दिनेश विजय यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. या आधी स्त्री या हॉरर कॉमेडी सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती.
जान्हवीच्या डान्सचा जलवा
Contents hide