• Mon. Jun 5th, 2023

जागवूया स्त्रीशक्तीला

ByGaurav Prakashan

Mar 8, 2021
    समाज बोलतो चूल अन मूल
    स्त्रीने टाकले प्रगतीचे पाऊल
    घेतलीय गगनभरारीच आता
    नारींची परावलंबाची चाहूल

मध्यमवर्गीय घरातून आजही स्त्री किंवा मुलीने ‘सातच्या आत घरात’ ‘चूल आणि मूल’ ‘पायीची वहाण पायातच बरी’ अशा पुरुषप्रधान संस्कृतीने बनवलेल्या रूढीनुसारच वागावे अशी रीत आहे. घरात वडील, भाऊ, नवरा, सासरे, दीर यांच्या सल्ल्यानुसार जीवनक्रमणिका ठरवावी लागते.पुरूष म्हणतील ती पूर्व दिशा.’आभाळाला हात टेकण्याचे’ फक्त स्वप्नच पहावे लागते. आजही घराघरात अशा अबला वाढत आहेत, जगत आहेत. रात्री किती पर्यंत घरात असायलाच हवे, शिक्षणासाठी कोणता मार्ग चोखाळायचा किंवा वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशीच तिने विवाह करायचा हे आजही तिला ठरवायचे अधिकार नाहीत. ‘पुरुषांच्या हातातली कठपुतली’ असेच तिचे वर्णन समर्पक ठरेल.
मुलाच्या बेफाम वर्तनाला कधीच पायबंद नसतो. त्याला प्रश्न किंवा शंका विचारल्या जात नाहीत. परंतु मुलीला या सगळ्यातून तावून-सुलाखून निघावे लागते. माहेरी आणि सासरीही स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त नाही. आज कितीतरी क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण तिचे बुद्धिमान असणे ही पुरुषांच्या अहंकाराला डिवचल्यासारखे वाटते. बऱ्याच अंशी साक्षरतेमुळे जरी समाजात कायापालट होत आहे पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचेही मुलीला स्वातंत्र्य असू नये हे ज्वलंत उदाहरण अनेक कविता नि कथांतून पाहायला, वाचायला मिळते.
आजही हूंड्याच्या छळासाठी मुली प्राणास मुकतात.सासू सासऱ्यांच्या अत्याचारास बळी पडतात.नवऱ्याच्या मनमानीचे भक्ष्य बनतात.कितीतरी घरात आजही स्त्री कमावती असूनही तिला
नवऱ्याच्या तालावर नाचावे लागते. मानसिक, शारिरीक शोषण सहन करत असते.तिला कोणतेही स्वातंत्र्य नसते.नवऱ्याच्या मर्जीप्रमाणेच वागावे लागते.मग कसे ठरविणार की आजची स्त्री स्वतंत्र झाली आहे?. काहीजणी तरी कमवलेल्या धनाचा उपभोगही घेवू शकत नाहीत.पगाराच्या चेकवर सही करण्यापुरताच तिचा पगाराशी संबंध येतो.त्यातुन एकच साध्य होते की आजची स्त्रीदेखील पूर्णतः स्वतंत्र झाली नाही.बंधनांच्या श्रुखल्यांमध्ये आजही जखडली आहे.
पुरुषांना लिहिता येतं, त्यांना भावना असतात, त्यांना मित्र असतात किंवा त्यांचं वेगळं असं वलय आहे मग स्त्रियांचं का असु नये? आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. वैमानिक, अंतराळवीरांगणापासून ते पंतप्रधानपदापर्यंत स्त्रिया झेपावल्या आहेत. त्या शिक्षणाशिवाय गेल्या का? शिक्षण शिकण्यासाठी तरी त्यांना स्वतंत्र असणे गरजेचे असते. अभ्यासासाठीच नव्हे तर काही लेखिका आहेत, कवयित्री आहेत, न्यूज पेपर मध्ये एडिटर आहेत, सर्व लेखन किंवा वाचन करतात. ते वाचन उतरण्याची सवय असते, कोणाला डायरी लिहायची सवय असते.
पुरुषांच्या बरोबरीने सगळी क्षेत्रं आज स्त्रियांनी काबीज केली आहेत. पण उठल्यानंतर स्त्रीने हातात मोबाईल घेतला किंवा वर्तमानपत्र वाचायला बसली की घरातील लोकांच्या कपाळाला आठी पडते. कारण वर्षानुवर्षे त्यांना सवय झालेली असते पुरुषांनी बसायचं आणि बायकांनी हातात आणून द्यायचं. उठल्यानंतर चहापासून नाश्ता, जेवण, कपडे-भांडी, लादी, साफ सफाई, भाजी आणणे निवडणे सगळी कामे स्त्रियांची. पुरूषांनी फक्त बसायचं, खायचं, वृत्तपत्राची ओळ न् ओळ वाचायची आणि मधून मधून मोबाईल हातात घेऊन चाळायचा.
आज सर्वच क्षेत्रात स्त्रीचे वर्चस्व असल्याने तिला पारतंत्र्याची झळ लागत नाही. थोड्याशा त्रासासाठी देखील ती कायद्याचे दार ठोठावू शकते व न्याय मागु शकते. वैचारिक स्वातंत्र्यामुळे तिला स्वतःच्या भल्याबुऱ्याची जाणीव झाली आहे.पूर्वीच्या स्त्रीला तेव्हा ज्ञान नसल्याने आर्थिक व्यवहार देखील कळत नव्हते पण आजची स्त्री लाखों कोटी रुपयांचे व्यवहार स्वतःच्या हिमतीवर हाताळते. ती सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटून उठते. दुसऱ्या स्त्रीवर अन्याय असं असेल तर तिलाही सहकार्य करते व अन्यायाला वाचा फोडते. एकजूट करून ‘हम भी कुछ कम नही’ हे सिद्ध करून दाखवते. संस्कृती क्षेत्र म्हणजे नाटक-सिनेमा या क्षेत्रातही तिने प्रगती साधली आहे. पडदा पद्धतीचा पडदा फाडून तिने सर्व क्षेत्रात उडी घेतली आहे.
स्त्री म्हणजे कठपुतळी बाहुली नाही तिलाही मन भावना आहेत ती स्वतः विषयी विचार करू शकते. तिला दुखवणे म्हणजे त्या विस्तवात हात घालणे होय. जखमीं नागिणीच्या शेपटीवर पाय पडताच ती तशी फुत्कारते,चावा घेते तशी शेकडो वर्षांचा अन्याय सहन केल्यामुळे बंडखोर झालेली स्त्री फूलन देवी बनते. पुढे राजकारणात प्रवेश करून ती मुख्यमंत्री देखील बनते. पण ती अन्याय सहन करून झुरत नाही. अखेरपर्यंत अन्यायाशी झुंजत राहते व स्वतःला न्याय मिळवून घेते.
तिला सहानुभूती दया नको आहे तर योग्य न्याय हवा. इथे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आजची महिला स्वतःच्या पायावर उभी असल्याने आलेल्या संकटाला न घाबरता, न डगमगता खंबीरपणे लढा देते. संकटावर विजय मिळवते. त्यामुळे सती जाणे, केशवपन, विधवाविवाह बंदी अशासारख्या पुरातन चाली, रूढी, परंपरां च्या विरोधात ती पाय ठाकून उभी राहते. त्यातूनही तावून-सुलाखून निघते आणि यश प्राप्त करते.

    खांद्यालाच लावूनिया खांदा
    कमविते होऊन आत्मनिर्भर
    वाजती कर्तृत्वाचे ढोल ताशे
    नाहीच बसलीस कुढत जर्जर

आज सर्वच क्षेत्रात स्त्रीचे वर्चस्व असल्याने तिला पारतंत्र्याची जळी लागत नाही थोड्याशा त्रासासाठी देखील असती कायद्याचे दार तोटा होऊ शकते व न्याय मिळू शकते वैचारिक स्वातंत्र्यामुळे स्वतःच्या भल्याबुऱ्याचीजाणीव झाली आहेपूर्वीच्या स्त्रीला तेव्हा ज्ञान नसल्याने आर्थिक व्यवहार देखील कळत नव्हते पण आजची स्त्री लाख कोटी रुपयांचे व्यवहार स्वतःच्या हिमतीवर हाताळते ती सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटून उठते दुसऱ्या स्त्रीवर अन्याय असं असेल तर तिलाही सहकार्य करते व अन्यायाला वाचा फुटते एकजूट करून हम भी कुछ कम नही हे सिद्ध करून दाखवते संस्कृती क्षेत्र म्हणजे नाटक-सिनेमा या क्षेत्रातही तिने प्रगती साधली आहे पडदा पद्धती चा पडदा फाडून तिने सर्व क्षेत्रात उडी घेतली आहे
स्त्री म्हणजे कठपुतळी बाहुली नाही तिलाही मन भावना आहेत ती स्वतः विषयी विचार करू शकते तिला दुखणे म्हणजे त्या विस्तवात हात घालने होय जखमींना गिनीच्या शेपटीवर पाय पडतात भारती तशी झालेली स्त्री फूलन देवी बनते पुढे मुख्यमंत्री देखील बनते पण ती अन्याय सहन करून झुरत नाही समजत नाही तर ती चेता होते व अखेरपर्यंत अन्यायाशी झुंजत राहते व स्वतःला न्याय मिळवून घेते
तिला सहानुभूती दया नको आहे तर योग्य न्याय हवा हे स्वातंत्र्य आहे आजची महिला स्वतःच्या पायावर उभी असल्याने आलेल्या संकटाला न घाबरता न डगमगता खंबीरपणे सामना देते व संकटावर विजय मिळते त्यामुळे सती जाणे केशव पण विधवाविवाह बंदी अशासारख्या पुरातन मुलींना तिला तोंड द्यावे लागते पण त्यातूनही तावून-सुलाखून निघते आणि यश प्राप्त करते
भावनाप्रधान अशी हळव्या हृदयाची ही नारी चिडली की मात्र वाघीण बनते. महिषासुरमर्दिनी बनून समाजातील नरकासूरांचा संहार करते.

    सलाम करूया अशा स्त्रीशक्तीला
    उचलुनी वाटा समाजप्रबोधनाचा
    मुलगा मुलगी नका करु भेदभाव
    पिटूया डंका कन्येच्या संबोधनाचा

    सौ. भारती सावंत

    मुंबई
    9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *