बडनेरा : ८ मार्च २0२१ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्थानिक नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा येथील राज्यशास्त्र विभाग व महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवी बंद मोहीम अंतर्गत आभासी पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.गोपाल एस. वैराळे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दया पांडे समाजशास्त्र विभाग प्रमुख,भारतीय महाविद्यालय,अमरावती, प्रमुख अतिथी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष भूगोल विभाग प्रमुख डॉ. ओम प्रकाश मुंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे आयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख व महिला समिती समन्वयक डॉ. संगीता भांगडिया मालानी यांनी प्रास्ताविक करून केली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. दया पांडे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर स्त्रीवाचक शिवी विषयी सजगता या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. दया पांडे यांनी शिवी बंद मोहिमेची सुरुवात स्वत:पासून करण्यास सांगितली त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात शिवी न देण्याचे आवाहन करून कोणी शिवी देत असल्यास त्याच्याकडून एक रुपया वसूल करावे आणि जमलेल्या पैशातून महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर बनवावे. असे उपाय सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिवी बंद मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात बहुसंख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते तसेच इतर महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील डॉ. अळसपुरे, डॉ. होले, प्रा. बेलोकार, प्रा. माधुरी मस्के, प्रा. खोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, महिला समिती सदस्य डॉ. अंजली चेपे यांनी केले.