• Sun. May 28th, 2023

जागतिक महिलादिनाचा कार्यक्रम संपन्न

ByGaurav Prakashan

Mar 9, 2021

    पिंपळखुटा/स्वाती न.इंगळे,


श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर “महिला सक्षमीकरणवर”चर्चासत्राचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपज्योती महिला विकास संस्था अमरावतीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना प्रकाश शेटे,मूर्तिजापूरच्या पोलीस पाटील तथा माजी सरपंच आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी स्वयंसेविका पुनम प्रीतम वेरुळकर,छत्रपती हायस्कूल धामणगाव रेल्वेच्या प्रा.ज्योती शेंदुरजने प्रामुख्याने ऑनलाईन चर्चासत्राला उपस्थित होते. सर्वप्रथम ऑफलाइन कार्यक्रम अंतर्गत विचारपीठावरील प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.याप्रसंगी डॉ.मेघा सावरकर यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तद्नंतर ऑनलाईन चर्चासत्र संपन्न झाले.यावेळी पुनम प्रितम वेरुळकर प्रा.ज्योती भि.शेंदुरजने ज्योत्स्ना प्रकाश शेटे यांनी ऑनलाईन चर्चासत्राला सविस्तर मार्गदर्शन केले.महिला, स्त्रीशक्ती,महिलांची कर्तबगारी आणि विविध क्षेत्रातील प्रेरणास्रोत असलेल्या महिलांचे कार्याचा गौरव करीत भविष्यातही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका तसेच महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे तर आभार प्रदर्शन डॉ.मेघा सावरकर यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. यावेळी कोविड-१९-चे संदर्भात निर्देशित सर्व शासकीय नियामाचे पालन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *