नांदेड : पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणार्या आरोपीला नांदेडच्या भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली.
भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना २0 जानेवारीला घडली होती. याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
चिमुरडीवर बलात्कार करणार्या आरोपीला फाशी
Contents hide