अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्टांनुसार जिल्ह्यातील सर्व बेघर व्यक्तींना घरे मिळवून देण्यासाठी मिशनमोडवर कामे करून ३१ मार्चपूर्वी घरकुल मंजुरी व इतर प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल यंत्रणेला दिले. बेघरांना योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जि. प. सदस्य, पं. स. सदस्य व सर्व संबंधित पदाधिका-यांनीही सवर्ंकष प्रयत्न करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यातील आवास योजनेच्या कामांचा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी झूमच्या माध्यमातून बैठक घेऊन आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती व सदस्य, तसेच गटविकास अधिकारी यांनी या झूम बैठकीत सहभाग घेतला.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. आवास योजनेच्या माध्यमातून वंचितांना घराचा लाभ मिळवून देता येणे शक्य आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्याची कामगिरी तितकीशी समाधानकारक दिसत नाही. येत्या पंधरवड्यात ही स्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी योजनेचे उद्दिष्ट १00 टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे जि. प., पं. स. यंत्रणेतील पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी गावोगाव भेटी देऊन गरजू नागरिकांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया राबवावी. आपल्या भागामध्ये कुणीही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
रोज दोन हजार घरकुले मंजूर करा
मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यासह सर्व जि. प. व पं.स. सदस्य, सभापती, उपसभापती यांनीही विशेष लक्ष देऊन रोज किमान दोन हजार घरकुले मंजूर करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यंत्रणेकडून कुचराई झाल्यास प्रशासकीय कारवाई
जी अतिक्रमणे नियमानुकुल झालेली नाहीत, त्याबाबत गटविकास अधिका-यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून नियमानुकुल करून घ्यावी. याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के प्रकरणे निकाली काढावी व घरकुले मंजूर करावी. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात कुचराई केल्यास गटविकास अधिका-यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
गावठाणात जागा नसलेल्या व्यक्तींना जागा मिळवून देत त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी आवश्यक तिथे अतिक्रमण नियमानुकूल करणे, पं. दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना प्रभावीपणे राबवणे, ई व एफ क्लास जागा उपलब्ध करुन देणे किंवा बक्षिसपत्राद्वारे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी जागा दानपत्र करणे असे विविध पर्याय आहेत. घरासाठी जागा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील 14 हजार नागरिकांनी आवास योजनेत अर्ज केले आहेत. त्यांना शक्य त्या पयार्याचा अवलंब करून जागा मिळवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वांनी समन्वय ठेवून मोहीम राबवावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी येथे दिले.वंचित व गरजू व्यक्तींना घर मिळवून देण्यासाठी आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना घर मिळवून देण्यासाठी सवर्ंकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकही गरजू व्यक्ती वंचित राहता कामा नये. त्यासाठी सर्वांनी मिळून समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
घरकुल मंजुरी व इतर प्रक्रिया ३१ मार्चपूवी पूर्ण करावी
Contents hide