- ढोर हाकला हाकला
- आला दाराशी गायकी
- गाय-वासराच्या कशी
- भरली ऊरात धसकी
- गाय धावत सुटते
- चारा,गवत खावया
- पोट भरलं पाहिजे
- वासरू पाजाया
- वासरू थकते हंबरून
- आश्रू डोयात दाटते
- ऊर पन्हाळाया
- गाय गोठानं फिरते
- तळपत्या उन्हात
- ढोरं गोठानं हिंडते
- झाडा झुडपाच्या छायेत
- जीवं विसावते
- सुखदुःखाचे सोबती
- मिळून राबते
- मालकाच्या ईमानाले
- जिवापल्याड जपते
Contents hide
- सौ. शितल राऊत
- अमरावती
(Image Credit : Sanghpal Agame)