• Tue. Sep 26th, 2023

गृहमंत्री देशमुखांवरील आरोप खोटे-शरद पवार

ByGaurav Prakashan

Mar 23, 2021

नवी दिल्ली : बईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली. थेट गृहमंत्र्यांवरच पैसे वसुलीचे आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केले होते. गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोप खोटे असून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
त्यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?, असा आक्षेप शरद पवार यांनी घेतला आहे.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला. तर काल पुन्हा शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंग यांच्या पत्रावर मोठा गदारोळ झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली आहे. लोकसभेत देखील या मुद्द्यावरून भाजपाच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेले असताना शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला मोठा पुश दिला आहे. श्रद पवार म्हणाले, जर तुम्ही माजी पोलीस आयुक्तांचे पत्र पाहिले, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकार्‍यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचे ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात दाखल होते, असे पवारांनी सांगितले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!