- केलास खोटा तो बनाव आहे
- सीमेजवळ फारच तणाव आहे
- मागू नको भावा अनाज पाणी
- रागात सारा आज गाव आहे
- रक्तात वेडे माखले बघा रे
- धर्मात झुंजी हाच डाव आहे
- डोकेच नाही ज्यास आज येथे
- त्यांनाच आता फार भाव आहे
- समजून घेरे भारतीय बंधू
- बहुतेक देशाचे चुनाव आहे
- रंगात आता भांडतील सारे
- शाबूत खुर्ची त्यास ठाव आहे
Contents hide
- डॉ नंदकिशोर दामोधरे,
- अमरावती
- 9890911263)