मुर्तिजापूर: मराठी गझलप्रांतात सुपरिचित गझलदीप प्रतिष्ठान,मुर्तिजापूर यांच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट मराठी गझलसंग्रहांना गझलदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.दि.01-01-2020 ते 31-12-2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहांचा विचार या पुरस्कारांसाठी करण्यात येणार आहे.रोख रक्कम,आकर्षक सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप असून गझलदीप प्रतिष्ठान,मुर्तिजापूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय गझलदीप महोत्सवामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील.कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सन 2019 चे पुरस्कार घोषित झाले परंतू वितरण व्हायचे आहे. सदरहू परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. तरी सन्माननीय गझलकार बंधुभगिनींनी आपले उपरोक्त कालावधीत प्रकाशित झालेले गझलसंग्रह (2प्रती),स्वतःचा संपुर्ण परिचय, 2 पासपोर्ट फोटोसह संदीप वाकोडे ,मु.पो.सिरसो ता.मुर्तिजापूर जि.अकोला पिन कोड:-444107 फोन नं.9527447529 /9421832623 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
‘गझलदीप’ पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन…!
Contents hide