येवदा : पोलीस उपनिरीक्षक अमुल बच्छाव यांच्या रूपाने येवदा वासियांना खाकी वर्दीतील पर्यावरण कृषी पक्षीमित्र पाहायला मिळाला आहे.अमुल बच्छाव यांची येवदा पोलीस स्टेशन ला बदली होताच. कायदा व सुव्यवस्था तसेच परिसरातील अवैध धंद्यावर आळा बसविणारे दबंग ठाणेदार स्वता कुदळ व खराटा खांद्यावर घेऊन अधिकार्यांचे मार्गदर्शन व कर्मचर््यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात झाडांचा साचलेला कचरा साफ करण्याचा मानस ठेवून कार्यास सुरुवात केली. त्यांचे हे कार्य पाहून येवदा परिसरातील पोलीस पाटील ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने आठ एकर परिसरातील साफसफाई करून येवदा ठाण्यातील परिसर सुंदर व सुसज्ज करून स्वच्छता अभियानाचे मार्ग दर्शन घडवून आणले. गेल्या काही वर्षापासून दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे जिल्हा सीमेवर ग्रामीण भागात मोठे ठाणे आहे. काही महिन्यापूर्वी येवद्याचे ठाणेदार म्हणून अमुल बच्छाव यांची ब्राह्मणवाडा थडी येथून बदली झाली. तेव्हापासून बच्छाव यांनी या ठाण्याचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला होता. कायद्याचे भान ठेवणारे .कृषी पक्षी व निसर्ग मित्र म्हणून जिल्हा पोलिस दलात परिचित असलेले अमुल बच्छाव यांनी शासकीय निधीतून आणि लोकांच्या र्शमदानातून पोलीस ठाण्याचा आवार पोलीस स्टेशनची वास्तु रंगरंगोटी करून सुंदर व सुशोभित केले. हा आवार जवळपास ८ एकराचा असून या आवारामध्ये पोलीस भरती व सैन्य भरती करिता विद्यार्थ्यांच्या रनिंग करिता ट्रॅक बनवण्याचा ध्यास त्यांनी ठेवला आहे. तसेच विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज वाचण्याकरता लायब्ररी आवारामध्ये सुंदर गार्डन छोट्या मुलांकरिता झुले, वयो वृद्धांकरिता रमणीय ठिकाणाची निर्मिती निरनिराळ्या झाडांची नर्सरी करीत आहे. याआधी सुद्धा खाकी वर्दी कृषी मित्र म्हणून येवदा ठाण्याला ठाणेदार बापू रोहम त्यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य येवदा ठाण्याला लाभले आहे. त्यांनी या परिसरात सागाचीअनेक झाडांची वृक्षारोपण करून परिसर रमणीय बनला होता . या ठाण्याला दुसरे निसर्ग मित्र लाभल्याने आनंद व्यक्त होत आहे .येवदा आवर सुसज्ज करण्याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शन परिसरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील ग्रामीण भागातील सरपंच सदस्य पोलिस ठाण्याची कर्मचारी विद्यार्थी वर्ग दर महिन्याला र्शमदान देण्याकरिता येत आहे. येवदा ठाणे हे काही दिवसातच परिसरातील लोकांकरिता एक रमणीय पिकनिक पॉईंट बनल्याशिवाय राहणार नाही.खाकी वदीर्तील या निसर्ग मित्राचे जनतेकडून तोंड भरुन कौतुक होत आहे.
खाकी वर्दीतील पर्यावरण मित्र अमुल बच्छाव यांनी केला येवदा पोलिस ठाण्याचा कायापालट
Contents hide