अमरावती : जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात झालेली वाढ हि अमरावतीकरांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला होता. ९ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हया कोरोनाबाधितामध्ये मोठया प्रमाणात घट पहावयास मिळाली असून २८२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ४0 हजार २६८ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे.३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हयात आतापर्यत ५७२ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे. ५ हजार ८७५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ३३ हजार ८२१ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्हयात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना प्रशासनाने जिल्हयातील लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेवून काही प्रमाणात शिथिलता आणुन निर्बंध कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतांना जिल्हयात कोरोना अनियंत्रीत होता आता मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कोरोना रुग्णांची सख्या वाढू शकते याची दाट शक्यता वर्तविल्या जात असतांना अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पहावयास मिळाली आहे.९ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हया कोरोनाबाधितामध्ये मोठया प्रमाणात घट पहावयास मिळाली असून २८२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ४0 हजार २६८ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे.३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हयात आतापर्यत ५७२ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे. ५ हजार ८७५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ३३ हजार ८२१ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.