कोरोनाशी लढण्यासाठी एक कॅप्सूल पुरेसे

नवी दिल्ली : भविष्यात कोरोना व्हायरसची लस घेण्यासाठी सुई टोचून घेण्याची गरज पडणार नाही. फक्त एक कॅप्सूल खाल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. ही कॅप्सूल एक भारतीय औषध कंपनी अमेरिकी औषध कंपनीसह मिळून तयार करत आहे. कॅप्सूल लस भारतात तयार होत आहे. हे औषध तयार करत असलेल्या कंपनीचे नाव प्रेमास बायोटेक आहे. ही कॅप्सूल यायला कितीवेळ लागणार याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दोन्ही कंपन्यांनी १९ मार्चला कोरोना व्हायरसची ओरल लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार कॅप्सूल लसीच्या सिंगल डोसने कोरोनाशी लढण्यासाठी मदत होईल. ही लस खूप प्रभावी आहे. भारतीय औषध कंपनी प्रेमास बायोटेक अमेरिकी औषध कंपनी ओरामेड फार्मास्यूटिकल्ससह मिळून ही लस तयार करत आहेत. कॅप्सूल लसीचे नाव ओरावॅक्स कोविड १९ कॅप्सूल आहे.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या संशोधनादरम्यान कॅप्सूलची लस खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ही लस न्यूट्रीलायजिंग एंटिबॉडी आणि इम्यून रिस्पॉन्स ही दोघेही काम करत आहे. यामुळे आपला रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक कोरोना संक्रमण सुरक्षित राहतो. प्रेमास बायोटेकचे सह संस्थापक आणि प्रंबध मॅनेजर डॉ. प्रबुद्ध कुंडू यांनी सांगितले की, ओरावॅक्स कोरोनाची लस वीएलपी नियमांवर आधारित आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

तीनपट अधिक सुरक्षित
ही लस कोरोना व्हायरसपासून तीनपटींनी अधिक सुरक्षा देईल. कोरोना व्हायरसचे इंक प्रोटीन, मेम्ब्रेन एम आणि एनवेलप-ई टारगेट्स या तिन्हींपासून बचाव करेल. या औषधामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने येत असलेल्या श्‍वसनाच्या अडथळ्यांपासून बचाव होऊ शकतो.